पोलिसांच्या सेवा आता एका क्लिकवर! 'आपले सरकार' पोर्टलचा लाभ घ्या – पोलीस अधीक्षक नीलेश
ऑनलाइन उपलब्ध प्रमुख सेवा :
ध्वनिक्षेपक, सभा, मिरवणूक, शोभायात्रा, मनोरंजन कार्यक्रम परवानगी, विदेशी कलाकारांच्या सहभागासाठी अनुमती, चित्रपटगृह परवाना व नूतनीकरण, नोकरीसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, परदेशात शिक्षण/नोकरीसाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र, टिकाऊ वस्तू देशात परत नेण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र सार्वजनिक करमणूक व मेळावा परवान्यांचे नूतनीकरण आदी सेवा ऑनलाइन झाल्या आहेत.
एक लॉगिन... आणि काम फत्ते!
या सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्जदार म्हणून नोंदणी करून पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून तत्काळ ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी थेट ‘आपले सरकार’ संकेतस्थळाला भेट देऊन किंवा क्यूआर कोड स्कॅन करून या सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन बुलढाणा जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.