आमचे गुरुजी चोरीला गेले; विद्यार्थ्यांच्या गट शिक्षण अधिकारी यांच्या समोर घोषणा; अखेर एका शिक्षकाची केली प्रतिनियुक्ती; लाेणार तालुक्यातील पहुर येथील जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकाचे पद रिक्त !
Sep 3, 2025, 11:07 IST
लाेणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील पहुर येथील जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या माेठ्या प्रमाणात असूनही एका शिक्षकाचे पद रिक्त आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. या शाळेत शिक्षक देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी २ सप्टेंबर रोजी शाळेतच आंदोलन सुरू केले होते.तसेच आमचे गुरुजी दोन वर्षापासून चोरीला गेले अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. या आंदोलनाची दखल घेत पहुर येथील शाळेवर एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, पालकांनी आपले आंदाेलन मागे घेतले.
लाेणार तालुक्यातील पहुर येथील जिल्हा परिषद शाळेत गत काही दिवसांपासून शिक्षकाचे एक पद रिक्त आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. या शाळेवर एक शिक्षक नियुक्त करावा,यासाठी वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र निवेदनाची दाखल न घेतल्याने अखेर विद्यार्थी आणि पालकांनी शाळेतच आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत गट शिक्षणाधिकारी यांनी या शाळेला भेट देवून दाभा येथील एम.एम. पावडे यांची या शाळेवर प्रतिनियुक्ती केली आहे. त्यामुळे, पालकांनी आपले आंदाेलन मागे घेतले.