सुहागरात्रीला तिला नवऱ्याचे "सत्य" कळले! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी घटस्फोटाचा अर्ज!
Updated: Dec 13, 2025, 09:55 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घटना बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच तरुणीने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. लगाच्या दुसऱ्या दिवशी सुहागरात्रीला नवऱ्याचे धक्कादायक सत्य समोर आल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. तिसऱ्याच दिवशी सकाळी तिने वडिलांना सगळ सांगितलं, त्यानंतर दोन्हीकडील कुटुंबाची बैठक झाली. या बैठकीतच आपल्याला घटस्फोट हवा असल्याचे नववधूच्या कुटुंबियांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार नवरा मुलगा नागपुरात एका मोठ्या कंपनीत अभियंता आहे. घरी देखील २५ एकर शेती आहे. मुलगी मूळची संग्रामपूर तालुक्यातील असून सध्या कुटुंबीय अमरावती जिल्ह्यात स्थायिक आहे. मोठ्या धामधुमीत १ डिसेंबरला हे लग्न पार पडले. या लग्नात ८ लाख रुपये खर्च झाल्याचा दावा नवऱ्या मुलीच्या वडिलांनी केला आहे.
दरम्यान लग्नानंतर नवऱ्या मुलीने सुखी संसाराची स्वप्ने रंगवली होती. मात्र या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. मधुचंद्राच्या रात्री नवऱ्या मुलाकडून काहीच झाले नाही. आपण शारीरिक दृष्ट्या सक्षम नसल्याचे नवरदेवाने नवरीला सांगितले. हे ऐकून मुलीच्या पायाखालची जमीन सरकली.
कितीही प्रयत्न करून काहीच होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे मुलीच्या लक्षात आले. तिसऱ्या दिवशी मुलीचे वडील पारंपरिक विधीसाठी नागपूरला पोहचले. त्यावेळी मुलीने आपल्याला इथे नांदायचे नसल्याचे सांगितले. खूप विचारणा केल्यानंतर तिने तिच्या महिला नातेवाईकांना खरे कारण सांगितले. या सगळ्या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर घटस्फोटाची मागणी करण्यात आली. नवरदेवाच्या कुटुंबीयांनी एका महिन्याच्या आता लग्नात झालेला खर्च व भेटवस्तु परत देण्याची तयारी दाखवली आहे.
