पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वाढदिवसानिमित्त अंचरवाडीत रविवारी मोफत महाआरोग्य व औषध वाटप शिबीर; तज्ज्ञ डाॅक्टर देणार सेवा; शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन..!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा, अंचरवाडी  येथे मोफत महाआरोग्य व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत होणार आहे.या शिबीराचा अंचरवाडीसह परिसरातील गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन आयाेजकांनी केले आहे. 
"रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा" या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.शिबीरात डॉ. धनराज परिहार (MS OB-GY) – स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. वैभव शिंदे (D. Ortho) – हाड व संधिवात तज्ज्ञ, डॉ. स्वप्निल भराड (MD Medicine) – अंतर्गत रोग तज्ज्ञ, डॉ. सागर ठेंग (BDS) – दंतचिकित्सक आदी तज्ज्ञ डाॅक्टर सेवा देणार आहेत. या शिबिरातून गावकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी, सल्ला आणि औषधोपचार मिळणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.