महानगरपालिकांची निवडणूक! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांवर एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातल्या २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. नगरपालिका निवडणूक निकालात राज्यात भाजप नंबर वन तर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला..आता सर्वच पक्षांनी महानगरपालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. विशेषतः मुंबई,ठाणे, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर महानगरपालिका निवडणुकीसाठी विशेष जबाबदारी सोपवली आहे. 
शिवसेनेने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सोपवली आहे. यात अगदी तिसऱ्याच क्रमांकावर ना.प्रतापराव जाधव यांचे नाव आहे. या यादीत ना.जाधव यांच्यासह गजानन किर्तीकर, श्रीकांत शिंदे, सिनेअभिनेता गोविंदा, मंत्री गुलाबराव पाटील यांची नावे आहेत.