नगरपरिषद निवडणूक 2025! अध्यक्षपदासाठी 5, सदस्यपदासाठी तब्बल 33 उमेदवारांनी दाखल केले अर्ज...
Nov 13, 2025, 19:00 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायतींच्या अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. कार्यक्रमानुसार 10 नोव्हेंबर 2025 पासून नामनिर्देशनपत्र दाखल प्रक्रिया सुरू झाली असून, आतापर्यंत अध्यक्ष पदासाठी पाच तर सदस्यपदासाठी 33 नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली आहेत.
नगरपरिषदनिहाय नामनिर्देशन तपशील
बुलढाणा: सदस्यपदासाठी 3 नामनिर्देशनपत्रे,
चिखली: अध्यक्षपदासाठी 1 व सदस्यपदासाठी 8 नामनिर्देशनपत्रे, लोणार: अध्यक्षपदासाठी 1 नामनिर्देशनपत्र, मलकापूर: सदस्यपदासाठी 6 नामनिर्देशनपत्रे, मेहकर: अध्यक्षपदासाठी 2 व सदस्यपदासाठी 8 नामनिर्देशनपत्रे, नांदुरा: अध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी 1 नामनिर्देशनपत्र
शेगांव: सदस्यपदासाठी 6 नामनिर्देशनपत्रे
सिंदखेडराजा: सदस्यपदासाठी 1 नामनिर्देशनपत्र
याप्रमाणे, जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांसाठी एकूण अध्यक्षपदासाठी 5 आणि सदस्यपदासाठी 33 नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.
राजकीय पक्षांसह अपक्ष इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग आला असून, आगामी काही दिवसांत स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
