गॅस सिलेंडरचा स्फोट, आई व मुलगा गंभीर जखमी! मलगी येथील घटना...
Aug 27, 2025, 11:30 IST
मेरा.बु (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आई व मुलगा गंभीररित्या जखमी झाल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता वाजेच्या सुमारास चिखली तालुक्यातील मलगी येथे घडली.
मलगी येथील अंगणवाडी मदतनीस शोभाबाई रमेश परिहार ह्या २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी दररोजच्या प्रमाणे घरात स्वयंपाक खोली मध्ये स्वयंपाक करत होत्या. मात्र अचानक गॅस सिलिंडरचा स्पोट झाला. गॅस सिलिंडरचा स्पोटचा आवाज आल्याने गावकरी धावत घटनास्थळी पोहचले असता स्फोटामध्ये शोभाबाई रमेश परिहार व मुलगा राजेश रमेश परिहार हे दोघे जन गंभीररित्या जखमी झाले. त्यात शोभाबाई यांच्या अंगावरील साडी जळाली असून हाताला भाजले आहे तसेच डोक्याची केस जळाले. तसेच मुलगा राजेश याच्या पायाला भाजले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालय संभाजीनगर या ठिकाणी हलवण्यात आले.