शाेधमाेहिमेत जिल्ह्यात आढळले ३३ हजारांवर अपात्र; शिधापत्रिकाधारक रेशनकार्ड होणार रद्द; पुरवठा विभागाने राबवली हाेती शाेध माेहिम!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अपात्र असूनही जिल्ह्यातील ३३ हजार ९७१ लाभार्थी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याचे पुरवठा विभागाने राबविलेल्या माेहिमेत आढळले आहे. जिल्ह्यात पुरवठा विभागातर्फे १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत ही माेहिम राबवण्यात आली हाेती.
अपात्र असलेल्या या रेशनकार्डधारकांवर ‘ध्वजांकित लाभार्थी’ असा शेरा मारण्यात आला आहे. त्यांचे रेशनकार्ड रद्दसह रेशन धान्याचा लाभही बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.  जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सर्व शिधापत्रिका धारकांकडून नमुना तपासणी फाॅर्म भरून घेण्यात आले.या माेहिमेत श्रीमंत असलेले तसेच तीन हजार सरकारी कर्मचाऱ्यांनीही स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याचे आढळले आहे. आता या लाभार्थ्यांचे रेशनकार्ड रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. बुलढाणा तालुक्यात २३६९, चिखली ४६३१, देऊळगाव राजा ११६७, जळगाव जामोद २६०२, खामगाव ५१४१, लोणार २२२७, मलकापूर १२५६, मेहकर ३४८४, मोताळा १८८४, नांदुरा १९४५, संग्रामपूर १७९७, शेगाव २६९५ तर सिंदखेडराजा तालुक्यात २७७३ रेशनकार्ड धारक अपात्र असल्यावरही लाभ घेत असल्याचे आढळले आहे.