चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आ. श्वेताताई महाले पाटील सातत्याने आपल्या विकासाभिमुख भूमिकेमुळे चर्चेत असतात. आमदार म्हणून मिळालेली त्यांची पहिली टर्म प्रचंड गाजली. पहिली अडीच वर्षे विरोधी पक्षात असताना रस्त्यावर उतरुन सत्ताधाऱ्यांना भिडणारी रणरागिणी आणि दुसऱ्या अडीच वर्षात चिखली विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून मतदारसंघाचा केलेला कायापालट यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. समस्या कुठलीही असली तरी त्याचे उत्तर म्हणजे आ. श्वेताताई हे समीकरण आता मतदारसंघातील प्रत्येकाला ठाऊक झाले आहे..विकासकामांच्या झपाट्यामुळे आ. श्वेताताईंची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियावर देखील आ.श्वेताताईंची प्रचंड क्रेझ आहे..
फेसबुक , इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर असण्यात आ. श्वेताताई जिल्ह्यातील नेतेमंडळीत अगदी टॉपवर आहेत. त्यामुळे श्वेताताईंच्या सोशल मिडियावरील पोस्ट, रिल्सला, स्टोरीला हजारोंच्या संख्येत लाईक मिळतात. कुठल्याही पोस्टवर अगदी सूचक शब्दात केलेली मांडणी, सोशल मीडिया टीमकडून बनवण्यात येणाऱ्या दर्जेदार रिल्स यामुळे आ.ताईंच्या पोस्टची नेहमीच चर्चा होत असते. काल, चिखलीत महायुतीची महादहीहंडी आयोजित आली होती..या कार्यक्रमाला अक्षरशः गर्दीने उच्चांक गाढला..अतिशय सुपरहिट ठरलेल्या या कार्यक्रमाच्या रिल्स आता प्रचंड व्हायरल होत आहेत..यासोबतच आ. श्वेताताईंच्या एका इन्स्ट्राग्रामवरील स्टोरीची देखील प्रचंड चर्चा होत आहे. अतिशय सूचक अशा स्टोरीतून आ. श्वेताताईंनी कलियुगातील वास्तव मांडले आहे.. काय आहे आ. श्वेताताईंची इंस्टाग्राम स्टोरी...
आमदार श्वेताताईंचे इंस्टाग्राम वर १ लाख २५ हजार फॉलोवर आहेत. जिल्ह्यातील कुठल्याही नेत्याच्या तुलनेत हा आकडा प्रचंड मोठा आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर आमदार श्वेताताईंनी कालच्या महादहीहंडीची रिल्स पोस्ट केली असून ती प्रचंड व्हायरल होत आहे. त्याशिवाय भगवान श्रीकृष्णाच्या भक्त असलेल्या आमदार श्वेताताईंनी भगवान श्रीकृष्णाच्या फोटोसह "भरोसा रख, वो यहा तक लाया है.. तो आगे भी ले जाएगा .." अशा ओळी असलेली पोस्ट स्टोरीवर ठेवली आहे. आणखी एका स्टोरीत आ. श्वेताताईंनी कलियुगातील वास्तव अधोरेखित केले आहे. " ये कलियुग है, जहाँ सच को सुनने से ज्यादा लोग झूठ को मानने लगते लगते है... जहा इन्सानियत किताबो मे अच्छी लगती है, और जिंदगी मे लोगो को सिर्फ अपने फायदे की फिक्र होती है.. आज लोग रिश्ते निभाने से पहले हिसाब लगाते है..." अशी स्टोरी इन्स्टाग्रामवर आमदार श्वेताताईंनी ठेवली आहे..