आमदार श्वेताताईंनी "पोटतिडकी"ने मांडला हुमणी अळीचा विषय..! शेतकऱ्यांनी मानले श्वेताताईंचे आभार....; आजपासून होणार पंचनाम्यांना सुरुवात; श्वेताताई शेतकऱ्यांना मदत मिळवून देतीलच; शेतकऱ्यांना विश्वास...
हुमनी अळी जमिनीच्या आत असल्याने या रोगाचे निदान लवकर होत नाही. सोयाबीन पिवळे पडते आणि वाळून जाते. शेतकरी जेव्हा उपाय विचारण्यासाठी कृषी केंद्रात जातात तेव्हा महागडी औषधी दिल्या जाते..मात्र अळी जमिनीच्या आत असल्याने औषधांचा देखील फारसा प्रभाव पडत नाही. या अळीमुळे शेकडो हेक्टर शेती उध्वस्त झाली आहे.. अशा संकटात कोणतीही मदतीचे सावधान नसल्याने शेतकरी अडचणीत होते. सभागृहात हा प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधने आवश्यक होते. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्यास त्यांनी अतिशय पोट तिडकीने हा प्रश्न सभागृहात मांडला. नुकसानीचे प्रमाण मोठे असल्याने प्रसंगी निकष बदलून शेतकऱ्यांना मदत द्यावी त्यासाठी पंचनामे करावेत अशी मागणी आमदार श्वेताताईंनी केली. आमदार श्वेताताईंची तळमळ सभागृहाने बघितली..सरकारने तातडीने हा विषय गांभीर्याने घेतला आणि पंचनाम्याने आदेश कृषी विभागाला लागले. शासकीय पातळीवर पंचनामे होणार असल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आ. श्वेताताई शेतकऱ्यांना मदत मिळवून देतीलच असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे ..