आमदार संजय गायकवाड यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; काही तासांतच घेतला यू-टर्न; “उबाठाच्या बापालाही माझी कॉपी जमणार नाही” असे केले हाेते वक्तव्य!
दरम्यान, ठाकरे गटाच्या आंदोलनावर टीका करताना आमदार संजय गायकवाड यांनी विधान केले की, “उबाठा गटाच्या वतीने झालेले हे आंदोलन म्हणजे काहीच उरलेले नाही. त्यांना काही काम नाही, त्यामुळे ते माझी कॉपी करू शकत नाहीत, कारण मी ओरिजनल आहे. इतकंच काय, उबाठाच्या बापालाही माझी कॉपी जमणार नाही.”
या वक्तव्यामुळे नवा वाद पेटला. यावर स्पष्टीकरण देताना गायकवाड म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचे वडील असले तरी विचाराने बाळासाहेब आमचेही बाप आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असेही त्यांनी सांगितले. उबाठाच्या कार्यकर्त्यांचा बापाला माझी काॅपी करणे जमणार नाही असे आपल्याला म्हणायचे हाेते, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांचीही टिका
आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर उद्धव सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनीही टिका केली आहे. बेताल वक्तव्य आणि चुकीच्या वागणुकीची कुणीही काॅपी करणार नाही असा टाेला त्यांनी लगावला. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या बापाने आर्शिवाद दिला आणि उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिल्याने या महाशयांना विधानसभेची पायरी चढता आली, असे जयश्री शेळके यांनी म्हटले आहे.