खामगाव बाजार समितीच्या प्रशासकपदी महेश कृपलानी
दीपक जाधव यांची जिल्ह्याबाहेर बदली
Updated: Oct 22, 2021, 15:53 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव बाजार समितीच्या प्रशासकपदी मलकापूरचे सहायक निबंधक महेश कृपलानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकाचवेळी त्यांना खामगाव बाजार समिती आणि मलकापूरचे सहायक निबंधक कार्यालय दोन्हींचा भार पेलावा लागणार आहे. दीपक जाधव यांची जिल्ह्याबाहेर बदली झाल्यानंतर १४ ऑक्टोबरला ओमप्रकाश साळुंके यांनी प्रशासकपदाची सूत्रे हाती घेतली होती. आता कुपलानी यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधकांनी केली आहे.