आई रेणुका मातेच्या वहन मिरवणुकीवर महायुतीतर्फे पुष्पवृष्टी..!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणी आ. श्वेताताई महाले यांची प्रमुख उपस्थिती!
पुष्पवृष्टीच्या त्या पवित्र क्षणी वातावरणात श्रद्धा, भक्ती आणि आनंद यांचा अपूर्व संगम अनुभवायला मिळाला. प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आई रेणुका मातेच्या कृपेची झलक स्पष्टपणे दिसत होती. आमदार सौं.श्वेता महाले पाटील यांनी आई रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भाविकांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.
यावेळी विद्याधर महाले (मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव), नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषी जाधव, शहर प्रमुख विलास घोलप, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, कपिल खेडेकर, राहुल सवडतकर, भास्कर राऊत, बळीराम काळे, मायाताई म्हस्के (जिल्हा प्रमुख, शिवसेना महिला आघाडी), कैलास भालेकर, श्रीकांत टेहरे, राजेश पवार, अमोल ढोरे पाटील यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.