शेळगाव आटोळ मध्ये रातोरात बसवले माँसाहेब जिजाऊंचे स्मारक! जिजाऊभक्तांचा जल्लोष...

 
शेळगाव आटोळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा राजे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊंचे माहेरघर.. अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी केली..स्वराज्याची खरी ज्योत पेटवली ती मासाहेब जिजाऊंनीच.. समाजात मासाहेब जिजाऊंच्या विचारांची प्रेरणा वाढावी या हेतूने शेळगाव आटोळ येथे रातोरात जिजाऊ भक्तांनी मासाहेब जिजाऊंचे स्मारक उभारले आहे..
शेळगाव आटोळ येथे सरकारी दवाखान्याकडे जाणाऱ्या चौकात याआधी भगवा ध्वज उभारण्यात आला होता..आता त्याच ठिकाणी मासाहेब जिजाऊ चे स्मारक उभारण्यात आले आहे..आज सकाळी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर विधिवत स्मारकाचे पूजन करण्यात आले..