लाज सोडली; जन्मदात्या बापालाच पाजले विष, गळाही दाबला; बापाची मृत्यूशी झुंज! खामगावची घटना...

 
खामगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील शंकरनगर भागात जन्मदात्या वडिलांना सतत मारहाण करत, अखेर विष पाजण्याचा प्रयत्न मुलाकडून करण्यात आला.  मुलाविरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
प्रल्हाद मधुकर उमाळे (५०) हे शंकरनगर येथे पत्नी सोबत राहतात. त्यांचा मुलगा शुभम प्रल्हाद उमाळे (२४) हा वारंवार वाद घालत असल्याची तक्रार आहे. ४ ऑगस्ट रोजी दुपारी प्रल्हाद उमाळे पत्नीला किरकोळ खर्चासाठी पैसे देत असताना शुभमने संतापून वडिलांना मारहाण केली. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा हल्ला केला. ५ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास आरोपी शुभम हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला व शिवीगाळ करून वडिलांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, जखमी प्रल्हाद उमाळे यांना पत्नीने रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.व्या तक्रारीची माहिती कळताच आरोपी शभमने संतापुन ५ ऑगस्टच्या रात्री पुन्हा मारहाण केली. ६ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता वडील घरी झोपलेले असताना शुभमने त्यांच्या छातीवर पाय ठेवून गळा दाबला व जबरदस्तीने वीष पाजल्याची आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना विषबाधा झाली असून उपचार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस तक्रार आणि तक्रारदारांच्या जबाबावरून शुभम उमाळे याच्याविरुद्ध २३ ऑगस्ट रोजी कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३५१ (१) (२) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.