बुलढाण्याच्या मिर्झानगरमध्ये बिबट्याची दहशत! सीसीटीव्हीत झाला कैद; वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा...
दरम्यान, रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या थेट मिर्झानगरच्या गल्लीबोळांत फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. जंगलातील बिबट्या घरांच्या दरवाज्यापर्यंत येऊन पोहोचल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.
वनविभागाकडून खबरदारीच्या सूचना
बिबट्याचा वाढलेला वावर लक्षात घेता वनविभागाने या परिसरात गस्त वाढवली आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच
रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे,घराच्या परिसरातील पथदिवे सुरू ठेवावेत, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये,परिसरात कचरा टाकू नये,मोकाट कुत्रे व डुकरे जमा होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी,बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा,अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
बिबट्याच्या या वावरामुळे रात्री कामावरून घरी परतणारे नागरिक तसेच पहाटे फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक भयभीत झाले आहेत. अनेकांनी रात्री उशिरा घराबाहेर पडणे टाळले असून, लहान मुलांचे घराबाहेर खेळणेही बंद झाले आहे. वनविभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
