जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुध्द एलसीबीचा धडाका सुरूच; जुगार-दारूच्या ५ कारवाया, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त; वरली मटका व अवैध दारूवर पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपींवर गुन्हे दाखल..!
या मोहिमेदरम्यान १२ मार्च २०२६ रोजी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगाव माळी येथे वरली मटका जुगार चालवित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत रामदास भानुदास हिवाळे (वय ५४) याला पकडले. त्याच्याकडून नगदी व जुगार साहित्य असा २,२८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाताळा येथे वरली मटका खेळत असल्याच्या संशयावरून राहुल सुरेश सुरडकर (वय २९) याला पकडून ९१० रुपयांची रोकड व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतही जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत शेख अजगर शेख अकबर याच्यासह आणखी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ६,३५० रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण १ लाख ३४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय अवैध दारूविरोधातही कारवाई करण्यात आली. बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळा बाजार येथे सुनील उखर्डा ढोकणे (वय ४२, रा. जवळा बाजार, ता. नांदुरा) याच्याकडून देशी-विदेशी दारूच्या ४६ बाटल्या व इतर साहित्य असा ४,६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अमडापूर येथे गजानन जयराम वानखेडे (वय २६) याच्याकडून विदेशी दारूच्या ४४ बाटल्या तसेच मारुती सुझुकी इक्को कार असा १ लाख ५९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण पाच कारवायांमधून पोलिसांनी ३,०१,८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत जुगार व अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा घातला आहे. या सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलिस ठाणे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात सपोनि. यशोदा कणसे, पोउपनि. पंकज सपकाळे, अविनाश जायभाये पोहेकों विजय पैठणे, अनंता फरतळे, शरद गिरी,गजानन दराडे, युवराज राठोड, दिनेश बकाले, दिपक लेकुरवाळे ,एजाज शेख ,गणेश पाटील ,गजानन गोरले ,सतीश नाटेकर, राकेश नायड्डु, सुनील मिसाळ, गणेश वाघ ,मपोका दिपाली चव्हाण ,अमोल वनारे ,अमोल अंभारे ,चालक पोकों निवृत्ती पुंड स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांचे पथकाने केली.