चिखलीत काशिनाथ आप्पांचा घरोघरी संपर्क; प्रचारात घेतली वेगवान आघाडी; महाविकास आघाडीची एकजुट....
Nov 23, 2025, 17:01 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्यासाठी महाविकास आघाडीचा प्रचार वेग पकडत आहे. चिखली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तापलेली हवा अधिकच रंगतदार होत असताना बोंद्रे यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या तिन्ही पक्षांनी ठामपणे एकत्र येत वज्रमूठ अधिक मजबूत केल्याने बोंद्रे यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
बोंद्रे यांच्या सभांना, पदयात्रांना आणि कॉर्नर मिटिंग्सना नागरिकांचा वाढता प्रतिसाद दिसत आहे. विविध समाजघटक, महिला, युवा आणि हक्काचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या स्थानिक मंडळींकडून मिळणारा पाठिंबा त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत आहे. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्यसेवा आणि युवकांना योग्य संधी मिळाव्यात, यासंबंधी त्यांनी मांडलेल्या स्पष्ट भूमिकेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे मोठे वातावरण तयार झाले आहे. आखलेली नियोजनबद्ध प्रचार मोहीम आणि सातत्याने घेतला जाणारा जनसंपर्क यामुळे बोंद्रे यांच्या समर्थकांमध्ये विजयाची भावना बळावत आहे. एकूणच चिखलीत काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या बाजूने सकारात्मक, अनुकूल आणि उत्साहवर्धक वातावरण तयार झाले असून त्यांच्या प्रचार मोहिमेला व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
