दयावान अन् विकासाभिमुख नेतृत्व म्हणजे काशिनाथ आप्पा बोंद्रे! प्रा.नरेंद्र खेडेकर यांचे प्रतिपादन; म्हणाले,महाविकास आघाडीच्या हाती नगरपालिकेची सत्ता द्या, कायापालट करून दाखवू....

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहराच्या प्रगतीसाठी सक्षम, प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज अधोरेखित होत असताना महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे हे दयावान आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून शहरात ठळकपणे पुढे आले आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात फिरून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा, समस्या जाणून घेणाऱ्या आप्पांच्या संवादशैलीने सर्वसामान्यांची मनं जिंकली आहेत. दरम्यान शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी म्हटले आहे की, काशिनाथ आप्पा बोंद्रे हे दयावान आणि विकासाभिमुख नेतृत्व आहेत. चिखली नगरपालिकेची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात द्या, आम्ही तुम्हाला शहराचा कायापालट करून दाखवू. प्रचंड बहुमतांनी काशिनाथ आप्पा बोंद्रे यांना विजयी करा असे आवाहन प्रा.खेडेकर यांनी केले आहे...
काशिनाथ आप्पा यांचा दयाळू स्वभाव, लोकांच्या वेदना मनापासून समजून घेण्याची वृत्ती आणि कोणत्याही घटकातील नागरिकांना समान न्याय देण्याची भूमिका, हे त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरवत आहे. गरीबी, बेरोजगारी, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, तसेच हातगाडीधारक, व्यापारी, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या ते प्रामाणिकपणे समजून घेऊन त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा जनतेत विश्वास निर्माण झाला आहे असेही प्रा.खेडेकर म्हणाले.

शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी स्पष्ट आणि ठोस दृष्टी मांडली आहे. रस्ते, नाली, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, सुशोभिकरण, डिजिटल सुविधा, तरुणांसाठी रोजगार व कौशल्यविकास या क्षेत्रात आधुनिक आणि व्यावहारिक उपाय सुचवून आप्पांनी विकास हा वचन नव्हे तर कृती,असा संदेश दिला आहे. शहराला भविष्यातील गरजांशी जुळवून आधुनिक सुविधा देत प्रगत चिखली घडवण्याचा त्यांचा रोडमॅप लोकांमध्ये उत्साह निर्माण करतो.

काशिनाथ आप्पा यांची सर्वधर्मसमभावाची भूमिका

काशिनाथ आप्पा बोंद्रे यांची स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभाराची हमी आणि पक्षपाताशिवाय सर्वांसाठी काम करण्याची भूमिका यामुळे चिखलीकरांमध्ये त्यांच्याबद्दल अधिक विश्वास निर्माण होत आहे. सर्वधर्मसमभाव, सामाजिक ऐक्य, आणि सौहार्द जपण्याची त्यांची भूमिका शहरातील सर्व समाजघटकांना जवळ घेणारी ठरत आहे. शहरातील तरुणांमध्येही आप्पांविषयी आकर्षण आहे. रोजगाराच्या संधी, उद्योजकतेला चालना, डिजिटल सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांच्या माध्यमातून चिखलीला पुढील टप्प्यावर नेण्याची त्यांची तयारी तरुणांमध्ये आशावाद निर्माण करणारी आहे.