पत्रकार ऋषी भोपळे यांच्या खांद्यावर व्हॉईस ऑफ मीडियाची मोठी जबाबदारी! डिजिटल विंगच्या तालुका अध्यक्षपदी झाली निवड....
Jul 31, 2025, 19:07 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्रकार आणि पत्रकारितेसाठी लढणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या संघटनेच्या चिखली तालुका डिजिटल विंगच्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार ऋषी भोपळे यांची निवड झाली आहे. देऊळगाव घुबे सारख्या ग्रामीण भागातून येत ऋषी भोपळे यांनी पत्रकारितेत अल्पावधीत नावलौकिक कमावला आहे..
बुलडाणा लाइव्ह, बुलडाणा कव्हरेज या डिजिटल प्लॅटफॉर्म साठी काम करताना ऋषी भोपळे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सामान्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ऋषी भोपळे यांची लेखणी चालते..अतिशय स्पष्ट आणि निर्भीड पत्रकार म्हणून त्यांनी ओळख मिळवली असून ते उत्कृष्ट संघटक देखील आहेत. पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काम करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या चिखली तालुकाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांच्या मार्गदर्शनात डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष नितीन कानडजे पाटील यांनी श्री. भोपळे यांची नियुक्ती केली आहे. डिजिटल माध्यमातील पत्रकारांचे संघटन तयार करण्याचे काम डिजिटल विंग करत आहे. या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नांना शासन दरबारी पोहोचवण्याचे कामही व्हाइस ऑफ मीडिया करीत आहे. ऋषी भोपळे यांच्या नियुक्तीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे...