बुलढाण्यात लफडेबाज अधिकाऱ्याचा रात्रीस खेळ चाले!! बायको असतांनाही तरुणीसोबत बंद फ्लॅटमध्ये करत होता लिला; तिचा कावा त्याच्या ध्यानात नाही आला अन् मोठा गेम झाला...अधिकाऱ्याचे मानसिक "आरोग्य" बिघडले...
Sep 9, 2025, 19:16 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा परिषद सध्या वेगवेगळ्या कारणांनी तुफान चर्चेत आहे..२०२२ पासून प्रशासक राज असल्याने काही अधिकारी मनात येईल तसे वागतात..मनात येईल तेवढं खातात.. खाऊन खाऊन बक्कळ पैसा आल्याने एका अधिकाऱ्याची भूक चांगलीच वाढली... पोटाची भूक ठीक आहे हो.. पण "त्या"अधिकाऱ्याला इश्काची चटक लागली...एवढी की त्या इश्कात तो अधिकारी पूर्णपणे डुबला..तिच्यासाठी तो काही पण करायला तयार होई...परिवार मोठ्या शहरात अन् हा अधिकारी बुलढाण्यात हिरोळे गॅस एजन्सी समोरील एका पॉश फ्लॅट मध्ये राहतो..त्या फ्लॅट मध्ये त्याने कित्येक रात्री जागवल्या, बऱ्याचदा त्या फ्लॅट मध्ये पार्ट्याही चालायच्या..या अपार्टमेंट मधील इतर रहिवाशी त्या अधिकाऱ्याच्या वागणुकीला वैतागले होते, बऱ्याचदा समज देऊनही हा अधिकारी मात्र बिनधास्तपणे प्रेयसी सोबत लीला करायचा...मात्र मागील आठवड्यात चांगलेच मॅटर झाले.. मॅटर पोलिसांपर्यंतही गेले मात्र तडजोडीची सवय असलेल्या अधिकाऱ्याने आपली "शक्ती" पणाला लावून मॅटरची तडजोड केली...
जिल्हा परिषदेतील एका महत्वाच्या विभागाचा प्रमुख असलेला लफडेबाज अधिकारी याआधी जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातही नोकरीला होता. कोविड काळात त्याच्या गाडीत ७ लाखांची रोकड आणि दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या, तेव्हाही मॅटर पोलिसांपर्यंत गेले होते. बरं ते असो, तुम्हाला बुलढाण्यातला किस्सा सांगतो..गोष्ट मागच्या आठवड्यातल्या एका रात्रीची आहे..रात्रीचे साधारण १२ वाजले असतील.. अपार्टमेंटमधील नागरिकांना त्या फ्लॅट मधून बेदम मारहाणीचे आवाज ऐकू येत होते..आत काहीतरी गडबड सुरू होती हे कळतं होत, मात्र नेमकं काय होतंय हे कुणालाच कळत नव्हतं..अखेर एका सज्जन गृहस्थाने पोलिसांना कळवले, पोलीस घटनास्थळी पोहोचले..पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये तो अधिकारी, दोन तरुण आणि एक तरुणी असे चौघे जण होते.
आत कायं झालं?
मिळालेल्या माहितीनुसार फ्लॅटमध्ये जी तरुणी होती ती त्या अधिकाऱ्याची प्रेयसी होती. याआधीही बऱ्याचदा ती फ्लॅट मध्ये शिरताना दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर त्या रात्री देखील ती फ्लॅट मध्ये आली होती.. अनेक दिवसांपासून दोघांचे प्रेम संबंध (?) होते, मात्र त्या रात्री काय झाले कुणास ठाऊक..दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून बिनसले..तिने तिच्या दोन मित्रांना फ्लॅटवर बोलावून घेतले आणि मग तिघांनी मिळून त्या अधिकाऱ्याची चांगलीच धुलाई केली..पोलिसांनी रात्री उशिरा चौघांना पोलीस ठाण्यात नेले..मात्र बदनामीच्या भीतीपोटी कुणीही तक्रार दाखल न करता आपसात सेटलमेंट केली. तसाही हा अधिकारी सेटलमेंट करण्यात माहीर आहे म्हणा...मात्र बेदम धुतल्याने अधिकाऱ्याचे मानसिक "आरोग्य" चांगलेच बिघडले म्हणत्यात...