गॅस सिलेंडर बुकींग बाबत महत्त्वाचे अपडेट! आता ५ दिवसांनी.... ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती, तब्बल ४५ दिवसांनी...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): इराण युद्धामुळे  गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे, एकदा सिलेंडर बुक केल्यानंतर दुसरे सिलेंडर २५ दिवसांनी बुक करता येणार आहे. दरम्यान असे असतानाच आता केंद्र सरकारकडून गॅस बुकिंग संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.. सध्या सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गॅस बुकिंग करूनही तो वेळेवर मिळत नाही. एजन्सीच्या समोर रांगाच रांगा लागत आहेत. बुलढाण्यात तर मध्यरात्री दोन वाजेपासून रांगा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान ग्राहकांना गॅस सिलेंडर वेळेत मिळावे यासाठी सरकारने आतापर्यंत धोरणात वेगवेगळे बदल केले आहेत.
सध्या पीएनजी कनेक्शन वाढवण्यावर भर दिला जात आहे. अशातच आता गॅस बुकिंग च्या नियमात आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आता सिलेंडर बुक केल्यानंतर ते आणखी उशिरा मिळणार आहे.

नेमकं काय होणार?

सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात गॅस सिलेंडरची कोणतीही कमतरता नाही. मात्र अतिरिक्त बुकिंग ची सध्याची स्थिती लक्षात घेता गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर ते उशिरा मिळू शकते. याआधी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर तो लवकरच मिळायचा. मात्र आता बुकिंग केल्यानंतर सिलेंडर मिळायला चार ते पाच दिवस लागू शकतात. याआधी बुकिंग नंतर दोन ते तीन दिवसात सिलेंडर मिळायचा, मात्र आता आणखी दोन दिवस उशिरा म्हणजेच पाच दिवसांनी सिलेंडर मिळणार आहे...   गॅस सिलेंडर हवा असेल तर ओटीपी सिस्टीम अनिवार्य करण्यात आलेली आहे.. ग्राहकांनी ओटीपी फक्त सिलेंडर आणून देणाऱ्या डिलिव्हरी बॉयलाच द्यावा असे आवाहन ग्राहकांना करण्यात आलेले आहे. 

लोकांच्या मार्फत सध्या मोठ्या प्रमाणात बुकिंग केल्या जात आहे. अलीकडच्या काळात बुकिंग मध्ये 60 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सुजाता सैनिकांनी सांगितले. त्यामुळेच सध्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीत उशीर होत असल्याचे सुजाता शर्मा म्हणाल्या. दरम्यान सध्याच्या नियमानुसार एकदा गॅस सिलेंडर बुक केल्यास पंचवीस दिवसांनी नवा गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. ग्रामीण भागासाठी ही मर्यादा 45 दिवसांची करण्यात आली असून लवकरच परिस्थिती पूर्वत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.