बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावला तर २५ लाखांची भरपाई अन् सरकारी नोकरी मिळणार! वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांना "राज्य आपत्ती"चा दर्जा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यभरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. काही वर्षांपूर्वी केवळ घनदाट जंगलात आढळणारा बिबट्या आता मानवी वस्तीत शिरू लागला आहे. बुलडाणा जिल्ह्यातही बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये, रात्री शेतात भिजवण्यासाठी जाणारे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान राज्य सरकारकडून बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्यांना मिळणाऱ्या भरपाई मध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिबट्याचा हल्ला हा राज्य आपत्ती म्हणून गणल्या जाईल. हल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांना २५ लाख रुपयांची मदत व वारसांना सरकारी नोकरी मिळणार आहे.

या हल्ल्यांना राज्य आपत्तीचा दर्जा मिळाल्याने आपत्कालीन निधी आणि सरकारी मदतीसाठी असलेल्या अटी शर्ती अधिक शिथिल झाल्या आहेत. आतापर्यंत ही प्रक्रिया केवळ वनविभागा कृती मर्यादित होती मात्र आता आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियम लागू होतील. त्यामुळे निधीची उपलब्धता वाढून प्रक्रियेसाठी लागणारा विलंब कमी होणार आहे. याशिवाय वन्यजीव हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. यात गंभीर जखमी किंवा कायमचे अपंगत्व आलेल्यांना साडेबारा लाखांची मदत मिळणार आहे. दरम्यान वन्यजीव लोक उपस्थित येऊ नये, वन्यजीव आणि मानव असा संघर्ष उभा राहू नये यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना वन विभागाला राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहे.