मोठा कॉन्फिडन्स! बुलढाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून मिरवणुकीची तयारी! गाडी सजवायचे काम सुरू....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातला ११ नगरपालिकांचे निकाल आज लागत आहेत. दरम्यान बुलढाणा नगरपालिकेत सुरुवातीला आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजाताई गायकवाड  आघाडीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे. एवढेच नव्हे तर विजयी मिरवणुकीची तयारी देखील  शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे. विजयी मिरवणुकीसाठी रथ सजवणे सुरू आहे. शिवसेनेचे गजेंद्र दांदडे यांच्या वतीने कारंजा चौकात रथ सजवणे सुरू आहे...