शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जगप्रसिद्ध जॉन डिअर ट्रॅक्टर्सचे शोरूम आता मलकापूरमध्ये; २१ जुलै रोजी उद्घाटन!
उद्घाटनाच्या दिवशी जॉन डिअर 5042 D गेअर प्रो आणि 5045 D गेअर प्रो या नव्या मॉडेल्सचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या खास प्रसंगी ३१ जुलै २०२५ पर्यंत खास ऑफर्स जाहीर करण्यात आल्या असून, ट्रॅक्टर्स खरेदीवर ०% ते ६% पर्यंत कर्जव्याजदर (अटी लागू) देण्यात येणार आहे. यातच आणखी एक आकर्षक बाब म्हणजे पहिल्या १० ग्राहकांसाठी विशेष दर जाहीर केले आहेत: 5042 D गेअर प्रो फक्त ₹7,76,240/- 5045 D गेअर प्रो फक्त ₹8,14,229/
शेतकऱ्यांसाठी एक्सचेंज ऑफरही उपलब्ध
शेतकऱ्यांना कोणत्याही कंपनीचा जुना ट्रॅक्टर एक्सचेंज करून नवीन जॉन डिअर ट्रॅक्टर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन रामा ट्रॅक्टर्सचे संचालक शिवदास राजपूत उर्फ पप्पू शेठ यांनी केले आहे.
जाॅन डिअर १८८ वर्षांची अमेरिकन कंपनी
जॉन डिअर ही १८८ वर्षांची अमेरिकन कंपनी असून, ती भारतात पुणे व देवास येथील प्रकल्पांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ट्रॅक्टर्स उत्पादन करते. २८ HP ते १३० HP दरम्यानचे ट्रॅक्टर्स जॉन डिअर भारतात विक्री करते. यामध्ये 2 व्हील, 4 व्हील, CRDI इंजिन, पावर प्रो, गेअर प्रो, एसी कॅबिन, ऑटो ट्रॅक यांसारखी तंत्रज्ञानसंपन्न मॉडेल्स उपलब्ध आहेत.
10 हजारावर ग्राहक समाधानी
रामा ट्रॅक्टर्समार्फत आजवर १० हजारांहून अधिक समाधानी ग्राहक तयार झाले आहेत. गुणवत्तापूर्ण सेवा, पार्टस उपलब्धता आणि विश्वासार्हता यामुळे कंपनीने शेतकऱ्यांमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे. मलकापूर शाखेच्या माध्यमातून आता ही सेवा अधिक विस्तारित होणार आहे.