गोदरेज 105 मका वाण म्हणजे शेतकऱ्याची हमखास प्रगती; एकदा लावले म्हणजे यश निश्चित; लवकर येते आणि इतर मका वाणापेक्षा उत्पादन पण जास्त देते; प्रगतशील शेतकरी कृष्णाभाऊ चौधरी यांचा अनुभव...
Nov 24, 2025, 20:27 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : लाखनवाडा, ता. खामगाव, जि. बुलडाणा येथील प्रगतशील शेतकरी व कृषी विक्रेते कृष्णाभाऊ चौधरी (मालक – शेतकरी ऍग्रो सेंटर) यांनी गोदरेज कंपनीच्या गोदरेज 105 या मका वाणाने सातत्याने उत्कृष्ट उत्पन्न दिल्याचा अनुभव सांगितला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते कपाशी व तुरीचे क्षेत्र खाली झाल्यावर गोदरेज 105 या वाणाची लागवड करतात आणि दरवर्षी 40 क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन काढत आहेत.
कृष्णाभाऊंच्या मते, या वाणाचे फायदे असे , इतर मका वाणापेक्षा 20–25 दिवस लवकर पीक येते. अवकाळी पाऊस, वादळ वा प्रतिकूल हवामानाचा फारसा परिणाम होत नाही.कणसं मजबूत राहतात आणि पिक पडत नाही. विशेष म्हणजे वादळात किंवा पावसात झाडे खाली कोसळत नाही. बाजारात मागणी चांगली असल्याने विक्री दरही चांगला मिळतो.
ते पुढे सांगतात, “लाखनवाडा परिसरात मी सर्वप्रथम गोदरेज 105 या वाणाची लागवड सुरू केली. आज या भागात दरवर्षी सुमारे 10 मेट्रिक टन मका उत्पादन घेतो. कपाशी आणि तुरीनंतर तयार होणाऱ्या शेतात डिसेंबर–जानेवारीमध्ये विक्रीसाठी भरपूर माल मिळतो.”
कृष्णाभाऊ शेतकऱ्यांना संदेश देत म्हणतात, “अवकाळी वातावरण आणि उशिरा लागवडीसाठी गोदरेज 105 हा उत्तम पर्याय आहे. मागील पाच वर्षांत मी कधीही 40 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन घेतलेले नाही. यंदाही लागवड करून नक्कीच प्रगती साधता येईल.”
आपलाच,
कृष्णाभाऊ चौधरी
प्रगतशील शेतकरी व कृषी विक्रेता शेतकरी ऍग्रो सेंटर, लाखनवाडा
“कॉलिटी आणि कॉन्टिटी—नाद करायचा नाय... शेतकरी ऍग्रो सेंटरचाच विश्वास!”
