गोदरेज 105 मका वाण : शेतकऱ्यांच्या प्रगतीचा हमखास मार्ग! एकदा लागवड केली की यश निश्चित — उत्पादन इतर वाणांपेक्षा अधिक...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : यंदा गोदरेज 105 मका वाणाची लागवड का करावी, हे जाणून घेऊया. तालुका मलकापूर, गाव वरखेड येथील प्रगतशील शेतकरी आणि गोदरेज कंपनीच्या मका वाणाचे कट्टर चाहते संतोष होनाळे हे मागील पाच वर्षांपासून गोदरेज 105 वाणाची लागवड करत आहेत. कपाशी व तुरीचे क्षेत्र कमी झाल्यानंतर त्यांनी या वाणाला प्राधान्य देत सातत्याने 40 क्विंटलपेक्षा जास्त विक्रमी उत्पादन घेतले आहे.
होनाळे यांचे म्हणणे आहे की, “गोदरेज 105 मका हा इतर कंपनींच्या वाणांच्या तुलनेत 20 ते 25 दिवस लवकर येतो. अवकाळी पाऊस असो वा प्रतिकूल हवामान, हा मका सहजासहजी पडत नाही. वरखेड गावात मी सर्वप्रथम 105 वाणाची लागवड सुरू केली. आजही कपाशी आणि तुरीची शेते तयार झाल्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये मी या वाणाची लागवड करतो.”

ते पुढे म्हणतात, “मागील पाच वर्षांत मला एकरी कधीही 40 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की, अवकाळी वातावरण आणि उशिरा लागवडीसाठी गोदरेज 105 मका हा उत्तम पर्याय आहे. हे वाण लावा आणि आपले उत्पादन निश्चित वाढवा.”

आपलाच,
संतोष होनाळे
प्रगतशील शेतकरी, वरखेड

नाद करायचा नाही — क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे गोदरेज 105 मक्का!