बातमी गौरवाची! “मिशन झेड” अंतर्गत पहेल इन्स्टिट्यूटला सन्मानपत्र प्रदान...

 
बुलढाणा (प्रतिनिधी): गुणवंत तसेच होतकरू विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अभिनव आणि महत्वाकांक्षी “मिशन झेड (Mission ZEDD - ZP’s Education for Engineers & Doctors Dreamer)” या उपक्रमात उत्कृष्ट सहकार्य व सक्रिय सहभागाबद्दल पहेल इन्स्टिट्यूट, बुलढाणा या संस्थेला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत बुलढाणा जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी (NEET, JEE) गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध शैक्षणिक संस्थांचा सहभाग घेतला गेला असून, पहेल इन्स्टिट्यूटने त्यात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

पहेल इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. निखिल श्रीवास्तव यांनी संस्थेमार्फत दिलेले सहकार्य, मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांना हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुलाबराव खरात(प्र.से.), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. विकास माळी, तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी उपस्थित होते.

या सन्मानाबद्दल बोलताना श्री. निखिल श्रीवास्तव यांनी सांगितले की,

“Zilla Parishad, Buldhana कडून मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी Pahel Institute सदैव प्रयत्नशील राहील.”

हा सन्मान पहेल इन्स्टिट्यूटच्या कार्याची दखल घेणारा असून, जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या क्षेत्रात ही एक प्रेरणादायी नोंद ठरली आहे.