पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनात उत्कृष्ट कामगिरी; सी.सी.टी.एन.एस मध्ये जिल्हा प्रथम...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा जिल्हा दलाने सी.सी.टी.एन.एस. प्रणाली मानांकनात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सीसीटीएनएस हा राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प असून एन.सी.आर.बी. नवी दिल्ली यांचे कडून सर्व राज्यांमध्ये राबविण्यात येतो. या प्रकल्पा अंतर्गत बुलढाणा जिल्हयाचे 34 पोलीस स्टेशन संगणकीकृत असून संपूर्ण कामकाज ऑनलाईन सुरु आहे.
सीसीटीएनएस प्रणालीतील संपूर्ण फॉर्म फिडींग तसेच Success Stories, ITSSO, FIR Publish, Cri-MAC, FIR Transfer, CDR1, CDR2 या मध्ये राज्यस्तरावर बुलढाणा जिल्हा पोलीस दल पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे.
सीसीटीएनएस प्रणालीचे माहे जानेवारीचे गुणांकन नुकतेच जाहीर झाले असून हे गुणांकन राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्या मार्फत काढण्यात येते. त्यामध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस दलास माहे डिसेबर 2025 मध्ये देखील प्रथम क्रमांक मिळालेला होता. माहे जानेवारी 2026 चे गुणांकन नुकतेच जाहीर झाले असुन माहे जानेवारी 2026 मध्ये 201 पैकी 201 गुण मिळवत बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने राज्यस्तरावर सलग दुस-यांदा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. मागील सहा महिन्यापासुन बुलढाणा पोलीस दलाचे मानांकन हे 01 ते 05 क्रमांक या दरम्यान आहे.
सदरची उत्कृष्ट कामगिरी ही पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक तथा सीसीटीएनएस प्रणालीचे नोडल अधिकारी अमोल गायकवाड, डॉ. श्रेणीक लोढा अपर पोलीस अधीक्षक खामगांव, सीसीटीएनएस प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक सचिन पाटील सोबत पोहेकाँ सुनिल वाघमारे, पोकाँ किरण चिंचोले, मपोहेकॉ. दिपमाला पुरंदरे, मपोकॉ कविता पाडळे, प्रतिभा इंगळे, नगमा शेख, पोहेकॉ. संतोष कायंदे, मपोहेकॉ. दिपाली खर्चे, मपोकॉ. मनिषा चोरघडे तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांचे अधिनस्थ असलेले पोहेकॉ जीवन उबरहंडे, योगेश कुवारे, संदीप करुटले, पोकॉ. सतीष शिंदे, गणेश काकड आणि सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व त्यांचे अधिनस्थ असलेले सर्व सीसीटीएनाएस हॅन्डहोल्डर केली आहे.