डॉ.गोंधणे स्किन केअर अँड रिसर्च सेंटरचा गौरवशाली यशस्वी प्रवास – संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार...
Jan 2, 2026, 15:05 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : त्वचारोग उपचार क्षेत्रात विश्वास, सातत्य आणि संशोधनाची मजबूत परंपरा निर्माण करणाऱ्या डॉ. गोंधणे स्किन केअर अँड रिसर्च सेंटरने आपल्या वैद्यकीय सेवेची यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. या संस्थेची स्थापना संस्थापक डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांनी केली असून, त्यांच्या दूरदृष्टी व समर्पणातून ही संस्था आज संपूर्ण महाराष्ट्रभर शाखांचे जाळे उभारणारी अग्रगण्य त्वचारोग संस्था म्हणून ओळखली जाते.
पिग्मेंटेशन, मुरुमे, अॅलर्जी, सोरायसिस, एक्झिमा, केसांचे विकार तसेच विविध जुनाट व असाध्य त्वचारोगांवर येथे संशोधनाधारित व परिणामकारक उपचार करण्यात येतात. प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचारपद्धती राबविणे, हीच या सेंटरची ओळख आहे.
या यशस्वी प्रवासात आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, नवे संशोधन आणि अनुभवी डॉक्टरांच्या टीमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये व जिल्ह्यांमध्ये शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना दर्जेदार त्वचारोग उपचार त्यांच्या जवळ उपलब्ध होत आहेत.
उपचारांबरोबरच त्वचारोगांविषयी जनजागृती, योग्य स्किन केअरचे मार्गदर्शन आणि वैद्यकीय संशोधनाला चालना देण्याचे सामाजिक कार्यही ही संस्था सातत्याने करत आहे.
संस्थापक डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांच्या नेतृत्वाखाली अनुभव, रुग्णांचा अढळ विश्वास आणि संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारलेले सेवा-जाळे म्हणजेच डॉ. गोंधणे स्किन केअर अँड रिसर्च सेंटर — एक प्रेरणादायी यशोगाथा.
