करीअर घडवित असतांना विद्यार्थ्यांवर जबरदस्ती लादू नका - माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर; सुतार समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळयात जांभोरा येथे प्रतिपादन!
Jul 16, 2025, 14:28 IST
हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सुतार समाजातील प्रतिकूल व गरीब परिस्थितीतून शिक्षण घेवून उच्च पदस्थ अधिकारी झालेल्या व्यक्तींपासून विद्यार्थ्यांनी आदर्श व प्रेरणा घेतली पाहिजेत. आपल्या पाल्याला आवडीच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेवू द्या. विद्यार्थ्यांवर आपल्या अपेक्षांची सक्ती न करता त्याला ज्या क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे. त्याला त्या क्षेत्रात करीअर घडवू द्या. विद्यार्थी करीअर घडवित असतांना विद्यार्थ्यांवर जबरदस्ती लादू नका असे प्रतिपादन मेहकर चे माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना केले.
चिखली तालुक्यातील श्रीक्षेत्र येल्होजी महाराज संस्थान जांभोरा येथे बुलडाणा जिल्हा सुतार समाज एकत्रीकरण समिती बुलडाणा जिल्ह्याने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमात ते रविवारी ता. १३ रोजी बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी आनंदमूर्ती गजानन जवरकर यांनी विश्वप्रार्थना व शंखनाद करून वातावरण भक्तीमय केले. यावेळी मातला येथील समाधान जंजाळकर, कार्तिक जंजाळकर यांच्या गायनवृंदानी भक्तीगीत व स्वागतगीत सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विद्यापीठ जालनाचे कृषि वैज्ञानिक श्रीकृष्ण सोनूने हे तर विशेष उपस्थिती म्हणून भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाचे प्रणेते तथा मेहकर विधानसभेचे माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, व्याख्याते गजानन उगवेकर, सुतार समाज एकत्रीकरण समिती अध्यक्ष अनंत राऊत उपस्थित होते. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदवीधर तसेचस्पर्धा परिक्षेतील यशस्वी अशा एकून १५० गुणवंतांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्यांचा सत्कार करण्यातआला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कोअर कमिटी सदस्य डॉ. विजय खोलाडे, समाधान सुरूशे, सतिष शिंदे, विजय रायमल, ज्ञानेश्वर बावस्कर, श्रीधर आव्हेकर, गजानन बोराडे, गजानन सुरूशे, अशोक घाटोळकर, शिवपाल खोलगडे, शांतराम सोनूने, दयानंद थोरहाते, मंगेश जवंजाळकर, पुरूषोत्तम वानखेडे, एकनाथ सपकाळ, शांताराव टवलाकर, मंगेश वेलकर, शंकर नेहाटकर, गजानन जवरकार यांच्या सह तालुकाध्यक्ष सह सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत राऊत यांनी तर सूत्रसंचालन विनोद खोलगडे, विजय रायमल तर आभार प्रदर्शन समाधान सुरूशे यांनी केले.