उऱ्हा येथिल शाळेला शिक्षक देता का शिक्षक ! विद्यार्थ्यांसह पालकांची आर्त हाक; जिल्हा परिषद शाळेला लावले चक्क कुलुप...

 
मोताळा : (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सध्या अनेक जिल्हापरिषद शाळांना अच्छे दिन आले असले तरी मोताळा तालुक्यातील उऱ्हा येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे या आधी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलने करुन जिल्हा परिषद मुख्यधिकारी यांनी आदेश काढूनही गेल्या सहा महिन्यापासून शिक्षक नसल्याने संतप्त पालकांनी युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे यांच्या नेतृत्वात चक्क जिल्हा परिषद शाळेलाच कुलुप लावले आहे.जोपर्यंत शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तो पर्यंत इथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला होता.

मोताळा तालुक्यातील उऱ्हा येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा असुन त्यामध्ये इयत्ता ५ वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेची पट संख्या ३५ असुन या शाळेतील २-३ विद्यार्थी दरवर्षी नवोदय साठी निवड होत असुन आतापर्यंत १८ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी डॅा.प्रविणकुमार देवरे यांनी भेट देऊन शाळेचे कौतुक देखील मागच्या काळात केले आहे. शाळा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहे. असे असतांना शाळेत गेल्या सहा महिन्यापासून शिक्षक नाही मागच्या आंदोलनात जिल्हापरिषद मुख्याधिकारी गुलाबराव खरात यांनी एका शिक्षकाला नियुक्त करूनही तो अद्यापही शाळेत आला नाही.  त्यामुळे शिक्षक हरवला की काय ...? असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.  त्यामुळे जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तो पर्यंत शाळा उघडु देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता.
त्यानंतर युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे यांनी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकाऱ्याशी संपर्क करुन त्यांना आजच्या आज शिक्षकाची नियुक्ती करावी अन्यथा पंचायत समिती मध्ये घुसायला आम्हाला वेळ लागणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर दोन तासात पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी पाटील साहेब हे आंदोलनस्थळी येऊन यांनी शिवाजी कोरडे या शिक्षकाची तात्काळ नियुक्ती केली. या आंदोलनात संदीप तायडे,रोहीत पाटील,रामा पाटील,तुकाराम पाटील,विजय सोनोने,गजानन मिटकरी यांच्यासह अनेक पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.