एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी मोताळ्यात धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन; विविध घोषणांनी दणाणला बस स्थानक चौक; अन्यथा मंत्र्यांना फिरू देणार नाही,समाज बांधवांचा इशारा...
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दहा वर्षे उलटूनही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला. सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे; अन्यथा येत्या काळात एका मंत्र्यालाही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
या निवेदनावर गोपाल काटे, रमेश धनके, शांताराम वाघ, शरद काळे, संदीप सहावे, रामेश्वर काळंगे, एकनाथ आयनर, दिलीप बिचकुले, दीपक बिचकुले, बाबुराव सोन्नर, विजय सोन्नर, दगडू आयनर, विजय खोदले, नंदू खोदले, कैलास सुशीर, अनिल गोंदले, योगेश जुमडे, सतीश कचोरे, अरविंद कचोरे, शिवा लवंगे, शिवदास सहावे, राजू सावळे, विशाल धनके, मधुकर धूनके, गजानन चऱ्हाटे, देविदास गोयकर, संजय येळे, वासुदेव शिंदे, मिलिंद जयस्वाल, अंबादास चाटे, विठ्ठल सोन्नर, सावकार बिचकुले, दगडू पिसाळ, पांडुरंग बिचकुले, गजानन धनके, लहू सुरळकर, ज्ञानेश्वर गोराळे, मोहन कारंडे, सिताराम बोरकर, धनराज धनके, अमित कचरे, संजय कचरे, अजय कचोरे, सागर वाघ, शिवा काटे, सचिन सुसरे, अनिल सावळे, सुनील कचोरे, गजानन सावळे, राहुल काटे, संतोष सोनवणे, संदीप जुमळे, मंगेश कचोरे, एकनाथ सहावे, सोपान काटे, दिलीप सहावे यांच्यासह असंख्य समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.