एसटी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी माेताळ्यात धनगर समाजाचा भव्य माेर्चा; विविध मागण्यांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..!

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मोताळा तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धनगर समाज हा वाड्यावर वस्तीवर राहून भटकंती करणारा समाज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत ३६ क्रमांकाने या समाजाला आरक्षण दिले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे.यापुढेही विलंब झाल्यास लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर गोपाल काटे, रमेश धुनके, रामभाऊ शिंगाडे, शांताराम वाघ, संदीप सहावे, रामेश्वर काळंगे, एकनाथ आयनार, चंदन मार्कड, मांगो मार्कड, लहू सुरळकर, अंबादास चाटे, भागवत पाटील, गजानन धनके, मंगेश मोरे, राजू सावळे, सुरेश मोरे, मोहन बाजोडे, शिवदास सहावे, विजय खोंदले, देवदास पाचपोर, सुधाकर सुशीर, पुंजाजी खोदले, अमित वसतकार, संजय कासे, अनिल धूनके, संतोष वसतकार, अनंता सोनाग्रे, निलेश पाचपोर, राजेंद्र वैतकार, मनोहर खोंदले, विठ्ठल सुशीर, एकनाथ सहावे, सुनील गोमकर यांच्यासह अनेक समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.