मोताळा तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; पुन्हई ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर मोर्चा; तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन...
मोर्चादरम्यान ग्रामस्थांनी शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,बियाणे,खते,मशागत आणि मजुरीवर झालेला खर्चही वसूल होण्याची शक्यता मावळली आहे. काही शेतकरी पिके वाचविण्यासाठी महागडे पाणी विकत घेत आहेत. मात्र वाढता उत्पादन खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
शासनाने तातडीने पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत,अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत, पीकविमा भरपाई तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
मोताळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शासनाने सात दिवसांच्या आत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. अन्यथा पुन्हई ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. सदर निवेदनावर गोपाल काटे, पुरुषोत्तम राऊत, अरुण राऊत,भानुदास राऊत, रामदास राऊत, सुरज राऊत,सुधाकर पाटील, कडु राऊत,योगेश बांगर,विष्णू तायडे, श्रीकृष्ण बांगर,भरत सोळंके, भानुदास पूर्ण,संदीप सहावे,शिवाजी बांगर, गजानन सहावे, चंद्रशेखर राऊत, अमोल राऊत,धोंडू शिंदे,शिवदास सहावे, नितीन राऊत,दिलीप राऊत, योगेश राऊत, राजीव कोलते, विजय राऊत, मधुकर बांगर, मंगेश राऊत,सचिन राऊत, सचिन बांगर, उमेश राऊत,शैलेश राऊत, नितीन राऊत, ईश्वर राऊत, विठ्ठल राऊत, मंगेश बांगर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.