सिंदखेड राजा तालुक्यात ढग फुटला! ओढ्याला आला अचानक पुर; काठावर चरत असलेली खिल्लार बैलजोडी वाहून गेली...

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथे काल, ६ ऑगस्टच्या दुपारी अचानक ढगफुटी झाली. यावेळी ओढ्याला पूर आल्याने ओढ्याच्या काठावर चरत असलेली खिल्लार बैलजोडी वाहून गेली. काही वेळानंतर दोन्ही बैल मृत अवस्थेत सापडले.यात शेतकऱ्याचे सुमारे पावणे दोन लाखाचे नुकसान झाले आहे..
शरद काशिनाथ नागरे यांची बैलजोडी हिवरखेड पूर्णा येथील ओढ्याच्या  काठावर चरत होती. दुपारी ३ ते ४ वाजेच्या तुम्हालाच अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, अचानक ओढ्याला पूर आल्याने बैलजोडी वाहून गेली. दोन तीन तासांनी निमगाव वायाळ शिवारातील जिजेबा राजाराम गोरे यांच्या शेतात बैल मृतावस्थेत आढळले. घटनास्थळी तहसीलदार ,तलाठी यांनी पोहोचून पंचनामा केला. शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी अशी मागणी जनमाणसातून समोर येत आहे..