‘संकटातला नागरिक हाच केंद्रबिंदू!’ प्रतापराव जाधवांच्या कार्यालयाचा प्रभावी पाठपुरावा; बुलडाण्यातील ४९ रुग्णांना PM Relief Fund मधून तब्बल १ कोटी २० लाखांची मदत...
Sep 4, 2026, 18:28 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी सरकारी योजना कागदावर न राहता प्रत्यक्ष उपचाराच्या वेळी उपयोगी पडणे महत्त्वाचे असते. याच भूमिकेतून केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाने गरजू रुग्णांसाठी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद ठरला आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीअंतर्गत सन २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बुलडाणा जिल्ह्यातील ७३ रुग्णांची प्रकरणे मदतीसाठी दाखल करण्यात आली होती. त्यापैकी ४९ रुग्णांना तब्बल १ कोटी २० लाख ६६ हजार रुपयांची आर्थिक मदत उपचारासाठी संबंधित रुग्णालयांमध्ये वर्ग करण्यात आली आहे. आणखी २१ प्रकरणे प्रक्रियेत असून केवळ ३ प्रकरणे रद्द झाली आहेत.

हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोगासह गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या रुग्णांना या निधीचा मोठा आधार मिळाला आहे. खासदार सुविधा केंद्र आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णांच्या प्रकरणांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना मदत मिळवून देण्याची भूमिका प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाने बजावली आहे. विशेष म्हणजे, एखाद्या रुग्णाला गंभीर आजाराशी लढताना उपचाराच्या खर्चाची चिंता सतावत असते. अशा वेळी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधीच्या कामातील महत्त्वाचे अंग आहे. ४९ रुग्णांना मिळालेली १ कोटी २० लाखांची मदत ही केवळ आर्थिक आकडेवारी नसून अनेक कुटुंबांसाठी उपचाराची आशा आणि मोठा दिलासा आहे. त्यामुळे या पाठपुराव्याबद्दल प्रतापराव जाधव यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.