शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करा !जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचे आवाहन...
Jul 21, 2025, 10:47 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व गजानन वाघ यांनी संयुक्तरीत्या केले आहे.
येत्या २७ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रुग्णांना फळवाटप , विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, गरजूंसाठी अन्नदान यासारखे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत व गजानन वाघ यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.