बुलढाणेकरांची पाण्याची चिंता मिटली; येळगाव धरणात ७५ टक्के जलसाठा; शहरालगतच्या पाच ते सहा गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला..!
Aug 12, 2025, 14:57 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहराला पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या जाेरदार पावसामुळे तुडुंब भरले आहे. सध्या या धरणात ७५ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे, बुलढाणा शहरातील सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या बुलढाणा शहरासह लगतच्या चार ते पाच गावांच्या पिण्याची चिंता मिटली आहे.
बुलढाणा शहराला नगर पालिकेच्या येळगाव धरणावरून पाणीपुरवठा करण्यात येताे. गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या जाेरदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरले आहे.यामध्ये १२.४० दलघमी क्षमता असलेल्या येळगाव धरणात ७५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे, बुलढणा शहरासह परिसरातील पाच ते सहा गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.