नगरपरिषद निवडणुकीसाठी बुलढाणा जिल्हा पोलिस सज्ज; 3 हजारांहून अधिक फौजफाटा तैनात! ड्रोनच्या नजरेखाली होणार मतदान...
बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, लोणार, शेगाव, नांदुरा, मलकापूर आणि जळगाव जामोद या नगरपरिषद क्षेत्रांमध्ये मतदान सुरळीत, शांततेत आणि निष्पक्ष पार पडावे, यासाठी तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
तैनात केलेला सुरक्षा बंदोबस्त:
अपर पोलीस अधीक्षक – 02
उपविभागीय पोलीस अधिकारी – 05
पोलीस निरीक्षक – 22
पोलीस अधिकारी – 93
पोलीस अंमलदार – 1266
RCP (दंगा काबू पथक) – 05 पथके
SRPF – 12 सेक्शन
होमगार्ड – 1400
जिल्ह्यातील महत्वाच्या मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या गस्त पथकांची रचना करून जलद प्रतिसाद यंत्रणा अधिक प्रभावी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापरही करण्यात येणार आहे.
समाजकंटक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून कोणत्याही अनुचित प्रकारास आळा बसवण्यात आला आहे. निवडणूक पूर्णपणे भीतीमुक्त आणि पारदर्शक व्हावी, यासाठी सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः सर्व नगरपालिका क्षेत्रांना भेट देत अधिकार्यांना निवडणूक बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन केले असून, आवश्यक सूचना दिल्या आहेत.