Buldana Live SUNDAY Special : अर्जंट पैसे हवे आहेत… जरा पाठवता का?, अचानक मित्राचा मेसेज येतो तेव्‍हा…

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मला अर्जंट पैसे हवे आहेत, उद्या परत करेल… बाहेर अडकलोय जरा पैसे पाठवा… असे मेसेज अचानक आला असेल तर लगेच मदतीसाठी धावू नका किंवा असे कसे पैसे मागितले बुवा म्हणून गोंधळूनही जाऊ नका… एकदा त्या मित्राला कॉल करून मेसेजबद्दल विचारणा करा… कारण फेसबुक खाते हॅक करून, अशा …
 
Buldana Live SUNDAY Special : अर्जंट पैसे हवे आहेत… जरा पाठवता का?, अचानक मित्राचा मेसेज येतो तेव्‍हा…

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मला अर्जंट पैसे हवे आहेत, उद्या परत करेल… बाहेर अडकलोय जरा पैसे पाठवा… असे मेसेज अचानक आला असेल तर लगेच मदतीसाठी धावू नका किंवा असे कसे पैसे मागितले बुवा म्‍हणून गोंधळूनही जाऊ नका… एकदा त्‍या मित्राला कॉल करून मेसेजबद्दल विचारणा करा… कारण फेसबुक खाते हॅक करून, अशा प्रकारे फ्रेंडलिस्‍टमधील लोकांना मेसेज केले जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

जिल्ह्यात अशा भामट्यांचे बळी मोठमोठे अधिकारी आणि नेतेही ठरले आहेत. हिवरखेडचे ठाणेदार प्रवीण तळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नावाने सुद्धा बनावट फेसबुक खाते उघडून पैशांची मागणी सायबर भामट्यांनी केली होती. मात्र त्‍यांनी वेळीच दक्षता घेऊन सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली. अलीकडच्या काळात तर अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्‍यामुळे तुम्‍हीही सावध राहा आणि असा प्रकार आढळला तर वेळीच सायबर क्राईमकडे तक्रार करा…जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या वर्षात फेसबुकद्वारे अश्लील मॅसेज, चॅटिंग, व्हिडिओ पाठवणे व बनावट खाते उघडल्याच्या ८० पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्‍टिटर, व्‍हॉट्‌स ॲपसारख्या सोशल मीडियावर आता सारेच आहेत. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे गुन्हे घडवणाऱ्या टोळ्याही उदयास आल्या आहेत. सायबर गुन्हेगार फेसबुकवर चांगल्या व प्रतिष्ठीत व्यक्तीचे फेसबुकवर बनावट खाते उघडतात (किंवा त्‍यांचे अकाऊंट हॅकही करतात.) बनावट खात्‍यावर त्याच व्यक्तीचा प्रोफाइल फोटो ठेवला जातो. त्यांच्या मित्रयादीतील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. अधून मधून त्या व्यक्तीच्या खऱ्याखुऱ्या खात्यावरील फोटो बनावट खात्यावर अपलोड केले जातात. त्यामुळे हे खाते आपल्या मित्राचेच आहे, असे त्यांच्या मित्रांना वाटतो. अधून मधून हाय… गुड मॉर्निंगचे मेसेजसुद्धा जातात. नंतर त्या बनावट खात्यावरून मित्रांना पैशाची मागणी केली जाते. अनेकांनी तर आपला मित्र अडचणीत आहे असे समजून पैसेही दिले. काहींनी रक्कम छोटी असल्याने तक्रारही केली नाही. पण अशा छोट्या छोट्या रकमेतून सायबर गुन्हेगार मात्र लाखो रुपये कमावतात. तक्रारीनंतर अशी बनावट खाते फेसबुक व पोलिसांकडून बंद केली जातात.

बुलडाणा सायबर पोलीस म्हणतात…
फेसबुकवरून फसवणूक होऊ नये म्हणून मित्र यादी वाढवण्याच्या नादात कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. मित्राने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल तर ती त्याचीच आहे का याबद्दल सुद्धा खात्री करणे गरजेचे आहे. एखाद्या मित्राने फेसबुकवरून पैसे मागितले असतील तर त्याला फोन करून खात्री करून घ्या. पैसे मागणारा तुमचा मित्र नाही याची खात्री झाल्यावर सायबर पोलिसांकडे तक्रार करा व बनावट खात्याला रिपोर्ट करा. तीन ते चार महिन्यांतून एकदा फेसबुकचा पासवर्ड बदलायलाच हवा.

-विलासकुमार सानप, सहायक पोलीस निरिक्षक, सायबर क्राईम शाखा, बुलडाणा