Breaking अरेच्चा! ड्रामा... रोहित पवारांचा बुलढाणा दौरा कॅन्सल! पण आ. गायकवाड यांच्या विरोधात मोर्चा निघणार; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, मोर्चाचे आयोजक कोण तेच माहीत नाही...समन्वयाचा अभाव!
Apr 28, 2026, 10:22 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आधीच तापमानाने उच्चांक गाठलेला असताना आज बुलढाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बुलढाण्यात येणार होते, "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाचे जाहीर वाचन करणार होते. शिवसेनेने देखील बाह्या वर खेचत "एकेरी उल्लेख झाला तर"? असा इशारा दिलेला होता. मात्र आता रोहित पवारांचा दौरा कॅन्सल झाल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी दिली आहे.याशिवाय संबंधित मोर्चाचे आयोजक कोण आहेत हेच आम्हाला माहित नाही असेही नरेश शेळके यांनी सांगितले..
दरम्यान आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आज मोर्चा काढणार आहेत. ठरलेला मोर्चा होणारच आहे. याच मोर्चात रोहित पवार येणार होते. मात्र या मोर्चात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत आहे. या मोर्चाचे आयोजक कोण आहेत हेच माहीत नसल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके म्हणाले. शिवाय रोहित पवार आज येणार नाहीत असेही शेळके यांनी स्पष्ट केल्याने पोलीस यंत्रणेनेही थोडाफार सुटकेचा निःश्वास टाकला आहे.