BIG BREAKING उमेदवारांचा जीव टांगणीला! मतमोजणी लांबणीवर; आता २१ डिसेंबरला होणार मतमोजणी...हायकोर्टाचा निर्णय...
Dec 2, 2025, 12:03 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय... नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उद्या म्हणजेच ३ डिसेंबरला मतमोजणी होणार होती..मात्र आता ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात यासंदर्भात एक याचिका दाखल झालेली होती, त्यावर आत्ता थोड्या वेळापूर्वी सुनावणी झाली, आता निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे..त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांच्या झोपा आता काही दिवस उडणार आहेत..
गेल्या कित्येक वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होत आहेत..मात्र दररोज नवीन निर्णय, नवीन बदल असे पहिल्यांदाच होत आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ३ डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र आता २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यातल्या काही ठिकाणच्या निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्यात, तिथे २० डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे आता आज मतदान होत असलेल्या आणि २० डिसेंबरला मतदान होत असलेल्या निवडणुकांचे एकत्रित निकाल २१ डिसेंबरला लागणार आहेत..
