Big Breaking… जिल्ह्यातील पोलीस दलात “नवा गडी नवा राज’; “एसपी’ चावरियांनी २४ पोलीस ठाण्यांना दिले नवे ठाणेदार!; २३ “पीआय’, २० “एपीआय’ बदलीवर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आजपासून जवळपास २४ पोलीस ठाण्यांत “नवा गडी नवा राज’ सुरू होणार आहे. २४ पोलीस ठाण्यांना कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी नवे ठाणेदार दिले असून, २३ पोलीस निरिक्षक आणि २० सहायक पोलीस निरिक्षकांच्या बदल्या काल, २३ ऑगस्टच्या रात्री उशिरा करण्यात आल्या. श्री. चावरीया यांच्या अध्यक्षतेखालील पोलीस आस्थापना मंडळाची बैठक …
 
Big Breaking… जिल्ह्यातील पोलीस दलात “नवा गडी नवा राज’; “एसपी’ चावरियांनी २४ पोलीस ठाण्यांना दिले नवे ठाणेदार!; २३ “पीआय’, २० “एपीआय’ बदलीवर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आजपासून जवळपास २४ पोलीस ठाण्यांत “नवा गडी नवा राज’ सुरू होणार आहे. २४ पोलीस ठाण्यांना कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी नवे ठाणेदार दिले असून, २३ पोलीस निरिक्षक आणि २० सहायक पोलीस निरिक्षकांच्‍या बदल्या काल, २३ ऑगस्‍टच्‍या रात्री उशिरा करण्यात आल्या. श्री. चावरीया यांच्या अध्यक्षतेखालील पोलीस आस्थापना मंडळाची बैठक काल बैठक झाली. बैठकीनंतर त्‍यांच्या स्वाक्षरीने बदलीचे आदेश जारी करण्यात आले.

या पोलीस निरिक्षकांना इथे दिली बदली…
पोलीस निरिक्षक अरुण परदेशी यांची नियंत्रण कक्षातून बदली करत खामगावच्‍या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार केले आहे. पोलीस निरिक्षक आनंद गोपाळ यांची नियंत्रण कक्षातून शेगाव शहर पोलीसचे स्टेशन ठाणेदार म्हणून, खामगाव शहर ठाण्याचे सुनील अंबुलकर यांच्‍याकडे जळगाव जामोद, दिलीप वडगावकर यांना नियंत्रण कक्षातून शेगाव ग्रामीण, कल्याण शाखेचे गिरीश ताथोड यांच्‍याकडे बुलडाणा ग्रामीण, एमआयडीसी मलकापूरचे एफ. सी. मिर्झा यांच्‍याकडे मलकापूर ग्रामीण, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेच्या निर्मला परदेशी यांच्‍याकडे मेहकर, नियंत्रण कक्षाचे अशोक लांडे यांच्‍याकडे चिखली, सिंदखेड राजाचे जयवंत सातव यांच्‍याकडे देऊळगाव राजा, तामगावचे भूषण गावंडे यांच्‍याकडे नांदुरा, बुलडाण्यातील सायबर क्राईमचे प्रदीप ठाकूर यांच्‍याकडे लोणार, नांदुऱ्याचे सुरेश नाईकनवरे यांच्‍याकडे खामगाव ग्रामीण, बुलडाण्याच्‍या जिल्हा विशेष शाखेतील प्रमोद उलामाले यांच्‍याकडे तामगाव, बुलडाण्याच्‍या नियंत्रण कक्षाचे आनंद महाजन एमआयडीसी मलकापूर, बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेचे राजेंद्र पाटील यांच्‍याकडे बोराखेडी, चिखलीचे गुलाबराव वाघ यांच्‍याकडे बुलडाण्यातील जिल्हा विशेष शाखा, मेहकरचे आत्माराम प्रधान यांच्‍याकडे बुलडाण्याची आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाण्यातील नियंत्रण कक्षाचे अनिल पाटील यांच्‍याकडे बुलडाण्यातीलच कल्याण शाखा, मलकापूर ग्रामीणचे अनिल बेहरानी यांच्‍याकडे बुलडाण्यातील सुरक्षा शाखा, लोणारचे रवींद्र देशमुख यांच्‍याकडे बुलडाण्यातील “एफआरओ’ शाखा, बुलडाणा नियंत्रण कक्षातील केशव वाघ यांच्‍याकडे सिंदखेडराजा, नियंत्रण कक्षातीलच प्रदीप त्रिभुवन यांच्‍याकडे खामगाव शहर तर देऊळगाव राजाचे संभाजी पाटील यांच्‍याकडे बुलडाण्यातील नियंत्रण कक्ष सोपवले आहे.

२० सहायक पोलीस निरिक्षकांच्‍या अशा आहेत बदल्या; “यांना’ केले ठाणेदार
सहायक पोलीस निरिक्षक नीलेश अपसूंदे यांना धाड येथून डोणगाव, सतिश आडे यांना जळगाव जामोद येथून पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून, युवराज रबडे यांना मेहकर येथून किनगाव राजा ठाणेदार म्हणून, अंढेराचे ठाणेदार राजवंत आठवले यांना रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार, गणेश हिवरकर यांना पासपोर्ट शाखा बुलडाणा येथून अंढेरा, एलसीबीचे नागेशकुमार चतरकर यांना अमडापूरचे ठाणेदार केले आहे. गजानन वाघ हे दोषसिद्धी विभाग बुलडाणा येथून ठाणेदार हिवरखेड, अमित वानखेडे जिल्हा विशेष शाखा बुलडाणा येथून एलसीबी बुलडाणा, रायपूरचे ठाणेदार सुभाष दुधाळ यांना सायबर पोलीस स्टेशन बुलडाणा, सायबर पोलीस स्टेशनचे विलासकुमार सानप यांना एलसीबी बुलडाणा, नीलेश लोधी यांना नियंत्रण कक्ष बुलडाणा येथून दोषसिद्धी विभाग बुलडाणा, डोणगावचे ठाणेदार दीपक पवार यांना नियंत्रण कक्ष बुलडाणा, किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ पवार यांना कोर्ट पैरवी अधिकारी बुलडाणा, दत्तात्रय वाघमारे यांना नियंत्रण कक्ष बुलडाणा येथून देऊळगाव राजा, रवींद्र लांडे यांना खामगाव शहर येथून शिवाजीनगर खामगाव, अलका निकाळजे यांना प्रतिबंध कक्ष येथून आर्थिक गुन्हे शाखा बुलडाणा, शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी यांना वाचक अपोअ खामगाव, हिवरखेडचे प्रविण तळी यांना नियंत्रण कक्ष बुलडाणा, स्मिता म्हसाये मलकापूर शहर यांना पुढील बदल्यांपर्यंत मुदतवाढ, पिंपळगाव राजाचे ठाणेदार सचिन चव्हाण यांना जिल्हा विशेष शाखा बुलडाणा येथे बदलून आणले आहे.