खामगावात बँक मॅनेजरला कानशिलात! कर्जमाफीच्या यादीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आक्रमक..!
Updated: Jul 30, 2026, 20:47 IST
खामगाव(भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या यादीबाबत विचारणा केल्यावर बँक मॅनेजरने उद्धटपणे उत्तर दिल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी बँक मॅनेजरला थेट कानशिलात लगावली आहे. ही घटना खामगावातील सेंट्रल बँक येथे घडली.
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसोबत बँकेत गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी मॅनेजरकडे यादीची मागणी केली तसेच कर्जमाफी बद्दल माहिती विचारली मात्र मॅनेजरने अपेक्षित उत्तर न देता शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप आहे. याच रागातून अमोल पाटील यांनी बँकेच्या केबिनमध्ये जाऊन मॅनेजरला कानशिलात लगावली. "शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे सोडून तुम्ही अरेरावी करता का?" असा सवाल त्यांनी केला. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बँक मॅनेजर तक्रार दाखल करण्यात खामगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरच्या वर्तनाचा निषेध करत त्वरित कारवाईची मागणी केली आहे.