थकबाकी ६३० कोटी रुपयांवर पोहचली; महावितरणतर्फे धडक वीजबिल वसूली मोहीम; वीज बिल भरून सहकार्य करा - राजेश नाईक
मुख्य अभियंता राजेश नाईक वीजबिल वसूली मोहीमेत सहभागी झाले असून उपविभाग निहाय तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या बैठका आयोजित करून प्रत्येक कर्मचाऱ्यांना वसूलीचे उद्धीष्ठ देत आहेत.तसेच अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुली करीत आहेत.
अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. परंतू जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या स्पष्ट सुचनाही देण्यात आल्या आहेत.
डिस्कनेक्शनचा मन:स्ताप व रिकनेक्शनचा भुर्दंड टाळा
महावितरणने आपले वीज कनेक्शन तोडण्याची वाट न पाहता ग्राहकांनी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकीची रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी ३१० रुपये तर थ्री फेजजोडणीसाठी ५२० रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
