अक्षय राऊत आणि मित्रमंडळाने स्वखर्चातून स्वतःच्या जेसीबी मशीनने खामगाव - मेहकर मुख्य रस्त्यावरील अपघात पॉईंट केला साफ..लोकांकडून कौतुकाची थाप..!

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव - मेहकर मुख्य रस्त्यावरील मच्छी फाटा हा अपघाताचा पॉईंट बनला होता. अनेक जणांचे अपघात या ठिकाणी झाले आहेत.काही लोकांना आपला जीव सुद्धा या ठिकाणी गमाववा ललागला आहे.
खामगाव - मेहकर मुख्य रस्त्यावरील मच्छी फाटा येथे मोठा वळण रस्ता आहे.या रस्त्याने दररोज हजारो वाहन येजा करत असतात. मात्र या मच्छी फाट्याजवळ वळणावर मोठ - मोठे काटेरी अनावश्यक झाडे आजूबाजूने वाढले होते. समोरून येणाऱ्या वाहनाला आपल्या विरुद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नव्हते त्यामुळे या ठिकाणी खूप वेळा अपघात झाले आहेत. गेल्या काही वर्षात अनेक लोकांनी आपले जीव सुद्धा या ठिकाणी गमावले आहेत.संबंधित प्रशासनाला याबाबत कोणतीही जाग आली नाही. स्वतः अक्षय राऊत यासह त्यांच्या मित्रमंडळाने स्वतःच्या जेसीबी मशीन व ट्रॅक्टरने हा सर्व अर्धा किलोमीटरचा रस्ता साफ केला आहे. यामुळे या रस्त्याने येजा करणाऱ्या हजारो वाहन चालक व स्थानिकांकडून अक्षय व त्याच्या मित्र मंडळाचे कौतुक होत आहे.