भरधाव दुचाकी कावड यात्रेत शिरली; एक भावीक ठार, तिघे गंभीर; बुलढाणा ते अजिंठा मार्गावरील घटना!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गुळभेली येथे जात असलेल्या कावड यात्रेत भरधाव दुचाकी शिरल्याने एक भाविक ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज ४ ऑगस्ट राेजी पहाटेच्या सुमारास बुलढाणा ते अंजिठा मार्गावर पळसखेड नागाे येथे घडली. मुकेश गजानन राठोड (रा. करवंड, वय २५ वर्षे) असे मृतकाचे नाव आहे. 
गुळभेली येथील कावडधारी बुधनेश्वर येथून पाणी घेऊन कावड यात्रा काढण्यासाठी साेमवारी पहाटे येत हाेते. दरम्यान, बुलढाणा ते अजिंठा मार्गावर असलेल्या पळसखेड नागाे येथे या कावडयात्रेत दुचाकीक्रमांक एमएच २८ बीझेड ५२७४ ही शिरली. या दुचाकीची जाेरदार धडक लागल्याने मुकेश राठाेड यांचा जागीच मृत्यू झाला.तसेच याेगेश चव्हाण,दुचाकीस्वार ऋषीकेश काकड, मनाेज माळाेदे हे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पाेलीस करीत आहेत.