लग्न मंडपात उठले आग्या मोहळ! वऱ्हाडाची पळापळ; ६ जण गंभीर; एकेकाच्या अंगातून काढले हजार काटे, तिघे आयसीयुत! मलकापूर तालुक्यातील घटना..

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर तालुक्यातील अनुराबाद येथील मंदिरात एका लग्नकार्यात खळबळ उडून देणारी घटना घडली. सनई चौघडांची मंगल धून, शुभकार्यात गुंतलेले वऱ्हाडी मंडळी अशा मंगलमय वातावरणात  परिसरातील एक आग्यामोहळ उठले. या आग्या मोहळाने वऱ्हाडी मंडळीवर हल्ला केला, अचानक झालेले हल्ल्याने वऱ्हाडी मंडळीची पळापळ झाली..२० ते २२ जणांना मधमाशांनी चावा घेतला, त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाले, यात वर बापाचा देखील समावेश होता. तिघांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, दरम्यान या प्रकारानंतर लग्नाचे स्थळ बदलून हा विवाह सोहळा उरकावा लागला. मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर तालुक्यातील अनुराबाद येथील मंदिरात एका लग्नकार्यात खळबळ उडून देणारी घटना घडली. सनई चौघडांची मंगल धून, शुभकार्यात गुंतलेले वऱ्हाडी मंडळी अशा मंगलमय वातावरणात  परिसरातील एक आग्यामोहळ उठले. या आग्या मोहळाने वऱ्हाडी मंडळीवर हल्ला केला, अचानक झालेले हल्ल्याने वऱ्हाडी मंडळीची पळापळ झाली..२० ते २२ जणांना मधमाशांनी चावा घेतला, त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाले, यात वर बापाचा देखील समावेश होता. तिघांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, दरम्यान या प्रकारानंतर लग्नाचे स्थळ बदलून हा विवाह सोहळा उरकावा लागला. मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर तालुक्यातील अनुराबाद येथील मंदिरात एका लग्नकार्यात खळबळ उडून देणारी घटना घडली. सनई चौघडांची मंगल धून, शुभकार्यात गुंतलेले वऱ्हाडी मंडळी अशा मंगलमय वातावरणात  परिसरातील एक आग्यामोहळ उठले. या आग्या मोहळाने वऱ्हाडी मंडळीवर हल्ला केला, अचानक झालेले हल्ल्याने वऱ्हाडी मंडळीची पळापळ झाली..२० ते २२ जणांना मधमाशांनी चावा घेतला, त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाले, यात वर बापाचा देखील समावेश होता. तिघांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, दरम्यान या प्रकारानंतर लग्नाचे स्थळ बदलून हा विवाह सोहळा उरकावा लागला. 
शुभकार्यात कधी अडथळा येईल हे सांगता येत नाही. असाच एक अनपेक्षित प्रसंग ८ मार्च रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरात घडला. हळदीचा समारंभ सुरू असतानाच मधमाशांनी वऱ्हाडी मंडळींवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला.

या घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये रामकृष्ण हरी पाटील (७०), रवींद्र हरी पाटील (६५), अर्जुन नामदेव चौधरी (६०), सुशीलाबाई पुंजाजी चौधरी (७०), ज्योत्स्ना नारखेडे (३२) आणि मनीषा विजय नारखेडे (२९) यांचा समावेश आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यापैकी तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील धरणगाव येथील अर्जुन नामदेव चौधरी यांचे चिरंजीव रूपेश यांचा विवाह दाभाडी येथील राजेंद्र सोपान चोपडे यांची कन्या कामिनी हिच्यासोबत ८ मार्च रोजी सोमेश्वर मंदिरात होणार होता. हळदीच्या कार्यक्रमासाठी निवडक वऱ्हाडी मंडळी, विशेषतः महिला, विवाहस्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे हळदीच्या समारंभात व्यत्यय आला.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी, सरपंच ज्ञानदेव ढगे तसेच गावकऱ्यांनी तत्काळ मदत करत जखमींना उपचारासाठी मलकापूर येथे हलविले. दरम्यान, विवाह समारंभासाठी पर्यायी स्थळाची व्यवस्था करण्यात आली आणि तेथे वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकून विवाह विधी पूर्ण करण्यात आला.