“गुलाब’चे काटे शेतकऱ्यांना ठरले जाचक! 90 हजार हेक्टरवरील सोयाबीनची नासाडी; सव्वा लाख हेक्टरवरील खरीप पिकांची नासाडी!! पंचनाम्यानंतर आकडे वाढण्याची शक्यता

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नावालाच गुलाब पण अंगावर काटेच काटे असे स्वरूप असलेले गुलाब चक्रीवादळ देशाच्या सीमेवरील बंगालच्या उपसागरात तयार झाले पण त्याचा प्रलयंकारी फटका हजारो किलोमीटरवरील बुलडाणा जिल्ह्यालाही बसला! केवळ 2 दिवसांतच गुलाबच्या “साईड इफेक्ट’मुळे जिल्ह्यात अभूतपूर्व पावसाने आपल्या रौद्रवताराने खरीप पिकांची ऐसीतैशी करून टाकली! प्राथमिक अंदाजानुसार सव्वा लाख हेक्टरवरील …
 
“गुलाब’चे काटे शेतकऱ्यांना ठरले जाचक! 90 हजार हेक्टरवरील सोयाबीनची नासाडी; सव्वा लाख हेक्टरवरील खरीप पिकांची नासाडी!! पंचनाम्यानंतर आकडे वाढण्याची शक्यता

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नावालाच गुलाब पण अंगावर काटेच काटे असे स्वरूप असलेले गुलाब चक्रीवादळ देशाच्या सीमेवरील बंगालच्या उपसागरात तयार झाले पण त्याचा प्रलयंकारी फटका हजारो किलोमीटरवरील बुलडाणा जिल्ह्यालाही बसला! केवळ 2 दिवसांतच गुलाबच्या “साईड इफेक्ट’मुळे जिल्ह्यात अभूतपूर्व पावसाने आपल्या रौद्रवताराने खरीप पिकांची ऐसीतैशी करून टाकली! प्राथमिक अंदाजानुसार सव्वा लाख हेक्टरवरील खरीप पिकांना याचा जबर फटका बसलाय! यात सर्वाधिक नुकसान बुलडाणा तालुका व सोयाबीन या मुख्य पिकाचे झाले आहे. मात्र आज, २९ सप्‍टेंबरपासून सुरू झालेल्या सर्वेक्षण व पंचनाम्यांनंतर नुकसानीचा अचूक आकडा स्पष्ट होणार आहे.

27 व 28 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने तांडव केल्याने तब्बल 1 लाख 25 हजार हेक्टरवरील खरीप पिकांची अतोनात नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला असून, 88 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झालीत. या खालोखाल 19 हजार 926 हेक्टरवरील कपाशी, 12 हजार 667 हेक्टरवरील तूर, 4486 हेक्टरवरील मका तर 578 हेक्टरवरील ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.